Chandrashekhar azad biography in marathi renuka

चला मग चंद्रशेखर यांच्याविषयी विषयी माहिती पाहू.

चंद्रशेखर आझाद यांची संपूर्ण माहिती Chandrashekhar Azad Information In Marathi

जन्म :

चंद्रशेखर आझाद यांच्या वडिलांचे नाव सिताराम तिवारी असे होते. तसेच आईचे नाव जगरानी देवी असे होते. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील अलीराजपुर जिल्ह्यातील भावरा गावात 23 जुलै 1906 मध्ये झाला. त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशातील कानपूर जवळच्या एका गावात राहत असे. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या.

त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतर झाले. चंद्रशेखर हे एक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक होते. भगतसिंग यांना आपले गुरू मानत असत.

बालपण व शिक्षण :

चंद्रशेखर यांचे वडील त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यामुळे चंद्रशेखर यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र त्यांच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले. 1921 मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात भाग घेतला.

तेव्हाच्या पंधरा वर्षे वय असणाऱ्या चंद्रशेखर ने त्यामध्ये सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांना अटकही झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखर ने आपल्या आडनाव आझाद असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच नावाने ओळखले जाऊ लागले.

क्रांतीकारी जीवन :

तारुण्यावस्थेत आधीच असहकार चळवळीत सक्रिय सहभागासाठी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांचे धैर्य देशप्रेम आणि निर्भयता यांच्या आयुष्यातील या घटनेने आपल्याला दिसून येते. जेव्हा न्यायालयामध्ये चंद्रशेखर यांना नेण्यात आले तेव्हा दंडाधिकाऱ्यांनी विचारले तुझे नाव काय? त्यांनी उत्तर दिले, “आझाद” वडिलांचे नाव, “स्वातंत्र्य” तुझे घर कोठे आहे? “चंद्रशेखर आझाद” यांचे उत्तर ऐकून दंडाधिकारी यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी चंद्रशेखरला तातडीने 15 वेताचे फटके लावण्याचे आदेश दिले.

असे म्हणत राहिले.

फटक्यांच्या शिक्षेमुळे आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला व अहिंसेवरील त्यांचा विश्वास उडला मनाने ते क्रांतिकारक बनले. काशीद श्री प्रणव वेश यांनी त्यांना क्रांतीची शिक्षा दीक्षा दिली. सन 1921 सालापासून 1932 सालापर्यंत ज्या क्रांतिकारी चळवळी प्रयोग योजना क्रांतिकारी पक्षाने योजना योजल्या. त्यात चंद्रशेखर आझाद हे आघाडीवर होते.

सन 1922 मध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन स्थगित केल्यानंतर आझाद अधिक आक्रमक झाला. त्यांनी एका युवा क्रांतिकारक मनमत गुप्ता यांची भेट घेतली. त्याने त्यांची ओळख राम प्रसाद बिस्मिल याशी केली. ज्याने ‘हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन’ या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली होती.

त्यानंतर ते सक्रिय सदस्य झाला आणि त्यासाठी निधी जमा करण्यास त्यांनी सुरुवात केली. असहकार चळवळीत सामील होऊन चंद्रशेखर हे रामप्रसाद बिस्मिल लाच्या अगदी जवळ आले. बिस्मिल्लाच्या नेतृत्वात त्यांनी स्वतःला हिंदुस्तानी रिपब्लिकन असोसिएशनच्या संस्थेशी जोडले. रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना 1926 मध्ये झाली.

आझादला त्याचा कमांडर बनविण्यात आले. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी व्हाइसरॉयच्या रेल्वेवर आणि असेम्ब्लीवर बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र चंद्रशेखर आझाद ब्रिटीश सरकारच्या हाती लागले नाही. दरम्यान एका खबऱ्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक नॉट बाबर यांनी अल्फ्रेड पार्क अलाहाबाद मध्ये आल्याबरोबर आजाद वर गोळी झाडली.

ती त्याच्या मांडीत लागली पण त्याच वेळी आझाद यांनी नॉट बाबर याच्यावर गोळी चालवून त्याचा हातच निकामी केला. मग आझाद सरपटत एका जांभळीच्या झाडाआड गेले.

तिथे हिंदी शिपायांना ओरडून ते म्हणाले, अरे…! त्यांनी निश्चय केला होता की, जिवंत असेपर्यंत ते पोलिसांच्या हाती लागणार नाही.

म्हणून त्यांनी आपल्या पिस्तोलमधील शेवटची गोळी राहिली होती तेव्हा ते त्यांनी आपल्या मस्तकाला लावले आणि चाप ओढला. त्याचक्षणी त्यांचे शरीर सोडून आत्मा पंचतत्वात विलीन झाले व नॉट बाबर म्हणाले, असे सच्चे निशानबाजी मी फार थोडे पाहिले आहेत.

पोलिसांनी त्याच्या निष्प्राण देहात संगिनी खुपसून ते मेल्याची खात्री करून घेतली. त्यांचा मृतदेह आल्फ्रेड पार्कमध्ये एक दरोडेखोर मारला गेला, असा अपप्रचार करीत तसाच जाळून टाकायचा सरकारने प्रयत्न केला.

पण पंडित मालवीय, कमला नेहरू यांनी तो उधळून लावून त्यांच्या अर्धवट शरीराची जळालेल्या शरीराची चिता विझवून पुन्हा त्यांचा अंत्यविधी हिंदू परंपरेप्रमाणे केला. 28 फेब्रुवारीला त्यांची प्रचंड अंत्ययात्रा काढून, एक विराट सभा घेण्यात आली व सर्व पुढाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

मृत्यू :

चंद्रशेखर आझाद हे 27 फेब्रुवारी 1931 रोजी अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे राजगुरू जेलमध्ये होते. तेव्हा त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावे. यासाठी ते एका क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असता, एका अज्ञात खबरीने पोलिसांना बातमी दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला चंद्रशेखर आझाद पोलिसांमध्ये गोळीबार झाला.

त्यांनी त्या गोळीबारामध्ये तीन पोलिसांना मारले. मात्र त्यांच्या जवळच बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वतःला मारून घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले.

पोलीस रेकॉर्डमध्ये नोंद :

भारतात गुन्हे नोंद करण्याची पद्धत थोडीफार ब्रिटिश पद्धतीवरच आधारित आहे. आजही एखाद्या पोलिस चकमकीत मारला जातो. त्यावेळी पोलिस जुन्या पद्धतीनुसारच त्याची नोंद करतात. गुन्हा रजिस्टरमध्ये गुन्ह्यांची संख्या आरोपीचं नाव आणि कलम 307 तसेच अंतिम अहवालाचा विवरण देण्यात येतो.

म्हणजेच संशयित आरोपीने पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. त्याच्या प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळी झाडली आणि बचाव करताना केलेल्या कारवाईत संशयित आरोपीचा मृत्यू झाला.

ज्या वेळी आझाद यांच्याकडे एकच गोळी उरली होती त्या वेळी त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली. असं म्हटलं जातं पण सरकारी रेकॉर्ड हे स्वीकारत नाही. अलाहाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या फौजदारी अभिलेखगार मध्ये 1970 पूर्वीचे दस्तऐवज उपलब्ध नाहीत.

अलाहाबाद परिक्षेत्राचे माजी पोलीस महासंचालक चतुर्वेदी सांगतात, कर्नलगंज पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविला आहे. त्यांना पोलिसांच्या ताब्यात जिवंत जायचं नव्हतं.

‘क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद ‘ ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-